त्या महिलेची परिस्तिथी पाहता तिथल्या एका परिचारिकेने त्या महिलेला तातडीने दाखल करून घेतले व उपचार ला सुरुवात झाली. बाहेर त्या महिलेचा पती थोडया आतुरतेने व थोडया काळजीने आपल्या होणाऱ्या बाळाची व पत्नीची वाट पाहत होता . साधारण ३० मिनिटानंतर एक परिचारिका बाहेर आली..त्या महिलेच्या पतीने अधिरतेने विचारलं " काय झालं बाई, माझी बायको कशी आहे, मुलगा हाय कि मुलगी " भीती व आनंद याचा संमिश्र भाव त्या व्यक्ती च्या चेहऱ्यावर होता. अत्यंत दुखी अंतकरणाने ती परिचारिका त्या व्यक्ती सांगू लागली " दादा ह्या अवस्थेमध्ये (गरोदर पणाच्या शेवटच्या महिन्यात) खूप पायी प्रवास झाल्यामुळे, बाळ हे पोटातच गेलं आम्हला माफ करा दादा आम्ही तुमच्या बाळाला नाही वाचवू शकलो." कोणीतरी गरम शिशाचा रस कानात ओतावा, असे त्या परिचारिचे शब्द त्या व्यक्ती कानात शिरले. क्षणभर त्याचा डोळ्यांसमोर अंधार आला. पडता पडता स्वतः ला सावरलं आणि फक्त एकच प्रश्न त्या परिचारिकेला विचारला " माझी बायको कशी आहे " "तुमची बायको ठीक आहे पण, जास्त रक्तश्राव झाल्यामुळे बेशुद्ध आहेत त्या, शुद्धीवर आल्या कि तुम्ही त्याना घेऊन जाऊ शकता. परिचारिका उत्तरली.
फाटलेला खिसा आणि डोळयातील अश्रू लपवीत ते आदिवासी दांपत्य आपल्या घराच्या दिशेने मार्गक्रमण करू लागलं पण, अति रक्तश्रावामुळे त्या महिलेला भोवळ येऊ लागली. त्या पतीने आपल्या पत्नीला सावरले व रुग्णवाहिकेचा चालकाला विनंती केली की " आम्हला आमच्या पाड्या वर जायचं आहे, जिथपर्यंत रस्ता आहे तिथंपर्यंत आम्हला सोडून द्या पुढे आम्ही जातो.” यावर तो चालक बोलला "सोडतो तुम्हाला पण ५० रुपये होतील” हे वाक्य ऐकताच ती महिला बोलली "असू द्या दादा आंम्ही जातो ,जवळच हाय" आणि त्या दुःखाचा डोंगर कोसळलेल्या दांपत्याने आपला पुढील प्रवास सुरु ठेवला. थोडं फार अंतर पार केल्यानंतर त्या महिलेला भोवळ आली व जमिनीवर कोसळली तिच्या पतीने तिला धरण्याचा प्रयत्न केला पण ती बोलली
" असू द्या हो माझं लेकरू मला बोलवत आहे आणि त्या महिलेने डोळे मिटले ते कायमचेच " हे चित्र आहे आयुष्मा भारताच