District President, Sambhaji Brigade, Nashik.

भविष्य तुमच्या हाती

जय जिजाऊ मित्रांनो!:

आज सकाळी वर्तमान पत्रात एक बातमी वाचली अन् मन अगदी सुन्न झालं. बातमी होती " देशात १० ते १७ वयोगटातील १.५८ कोटी मुले अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे आज सरकारने मा. सर्वोच न्यायालयात सांगितले " खरंच हे आकडे थक्क करणारे आहेत. १.५८ कोटी तरुण पिढी व्यसनाधीन झाली आहे आणि दिवसागणिक हे आकडे देखील वाढत आहे. ही देशासाठी नक्कीच चिंतेची बाब आहे.


youth social worker swapnil dada ingale nashik


मित्रांनो छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील त्या वेळेच्या युवा (मावळ्यांना) ना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली. हे आपण जाणताच. ही ताकद युवाशक्ती मध्ये आहे. पण आज आपल दुर्देव म्हणावं लागेल. युवा ताकद कुठं तरी हरवत चालली आहे, आपल्या मार्गावरुन पथभ्रष्ट होताना दिसत आहे . या युवा शक्ती ला जर वेळेवर योग्य मार्गाला नाही आणलं गेलं तर देशाचं न भरून येणार नुकसान देखील होऊ शकते.

माझ्या युवा मित्रांनो, मला माहित आहे तुम्हला कदाचित माझं बोलणं पटणार नाही. तुम्ही म्हणाल काय दादा आम्ही थोडी मस्ती पण करू नको का? किती टेंशन असत आम्हाला ? थोडा विरंगुळा म्हणून आम्ही अधिक मस्ती केली तर काय फरक पडणार आहे ? हो मित्रांनो, अगदी खरं आहे ह्य वयामध्ये मस्ती देखील केली पाहिजे पण त्याचबरोबर आपल्या करीयर कडे देखील लक्ष दिलं पाहिजे कारण हीच ती वेळ आहे आपलं जीवन योग्य पद्धतीने घडवायचं. तुमचं करीयर योग्य दिशेने मार्गस्थ करायचं . तुमचं वय असं आहे की " लाथ मारीन तिथे पाणी काढीन " एवढी ऊर्जा तुमच्या मध्ये आहे, या ऊर्जा चा योग्य ठिकाणी वापर करा.


माझ्या मित्रांनो, तुम्ही खूप थोर परंपरेतून आला आहात. छत्रपती संभाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम इत्यादी. असे खूप सारे नावे घेता येतील. या आपल्या भारत भूमी मध्ये असे अनेक अष्टपैलू व्यक्तिमत्त्व असणारे रत्न जल्माला आले. ज्यांनी आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर सातासमुद्रापार भारत देशा चा गौरव नेला. अश्या थोर वीर पराक्रमी वंश परंपरेतून आपण आला आहात हे विसरता कामा नये. ते त्याकाळाचे युवा होते, तुम्ही आजच्या काळातील युवा आहात, तुमच्या खांदयावर खूप मोठी जवाबदारी आहे. तुम्हला या यशाच्या थोर परंपरेला अधिक उंचीवर न्यावे व देशाचे नाव संपूर्ण जगात गाजवावे एवढी माफक अपेक्षा ह्या दादा ची आहे. तुम्ही सर्व माझी अपेक्षा नक्की पूर्ण कराल असा मला विश्वास आहे, ह्या प्रवासात कुठल्याही ठिकाणी असं वाटलं की आपण अडत आहात, काही समस्या येत आहे त्या वेळेस नक्की आवाज द्या. तुमचा स्वप्नील दादा कायम तुमच्या सोबत असेल


स्वतः ला आज एक वचन देऊया की कधीही कुठलंही वाईट व्यसन करणार नाही. समाजाच्या व देशाच्या हितासाठी जे असेल ते नक्की करू. आणि एक आदर्श समाज व्हावा यासाठी नक्की प्रयत्न करू.